लातूर जिल्हा न्यायालय मध्ये पदांच्या भरतीची मोठी जाहिरात

Latur District Court Bharti 2024

लातूर जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदांसाठी रिक्त जागा (महाराष्ट्र -१३ जागा ) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (लातूर जिल्हा न्यायालय )भरती मंडळाने जाहिरातीत जाहीर केली आहेत. पात्र उमेदवारांना https://latur.dcourts.gov.in/या वेबसाईट द्वारे त्याचे अर्ज ऑनलाईन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशिलावर जाहिरात (जाहिरात pdf ) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सबमिट करण्याची शेवटी तारीख १४ मे २०२४ आहे.

शेक्षणिक पात्रता :-

pdf वाचा  

नौकरी ठिकाण :-

लातूर 

वयोमर्यादा :-

१८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय ५ वर्षाची सूट )

वेतन :-

दरमहा रु . १५,०००/- तेरु.४७,६००/-पर्यत 

अर्ज पत्ता :-

जिल्हा सत्र न्यायालय, लातूर 

जिल्हा व सत्र न्यायालय :-

लातूर जिल्हा न्यायालयाचा आस्थापनेवरील “सफाईगार ” या पदाकरिता १० (दहा ) उमेदवारांची निवडसूची आणि ३ (तीन ) उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी, वेतनश्रेणी एस -१ रु.१५००० -४७६००/-अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतनश्रेणीत पात्र उमेदवारांन कडून ऑफलाईन अर्ज मांगविण्यात येत आहेत.

विस्तृत /सविस्तर जाहिरात विहित अर्जाचा नमुन्यासह, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांचे अधिकृत संकेतस्थळ https://latur.dcourts.gov.in सदरचा नमुना डाउनलोड करता येईल.

पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्या सोबत कागद पत्राचा स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकेने /पत्रा द्वारे म्हणजेच  RPAD किंवा शीघ्र डक सेवा पोच पावतीसह म्हणजेच speed post द्वारे या कार्यल्यास पाठवावेत, तसेच लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे नमूद करावे.  कोणत्याही परिस्थितीत हस्त्प्रेक्षणाद्वारे म्हणजेच “BY HAND” अर्ज स्वीकारले जाणार नाही. याची नंद घ्यावी, अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येतील याचीही नोंद घ्यावी. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४/५/२०२४ सायंकाळी ६;०० पर्यत आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा व्चिचार केला जाणार नाही.

विस्तुत जाहिरात अर्जाच्या न्मुण्यासह जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांच्या https://latur.dcourts.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा न्यायालय, लातूर 

दिनांक २९/४/२०२४                                                                                                                                                                                                 

जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर जाहिरात                                                                                                                                                                    

दूरध्वनी क्रमांक २२३८२-२४३५४४ :-

जिल्हा न्यायालय, लातूर च्या आस्थापनेवरील “सफाईगार (sweeper)” या पदाकरिता उमेदवारांची निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्या करिता पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत डाक द्वारे (RPAD) किंवा शीघ्र डाक सेवा (speed post ) द्वारे खालील पत्त्यावर दिनांक १४/५/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यत अथवा त्या पूर्वी पोहोचतील असे पाठवावेत. या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत.

सफाईगार :-

निवड सूचीसाठी सफाईगार पदांची -१० (दहा)

प्रतीक्षा सूचीसाठी सफाईगार पदांची संख्या -०३(तीन )

अर्हता:-

सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.

स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

उमेदवाराला दिनांक २८/३/२००५ नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या एकूण दोन पेक्षा जास्त नसावी.

अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरविले नसावे आणि त्याने /तिने/तिच्याविरुद्ध फोजदारी खटला /तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फोजदारी खटला/तक्रार याचा निर्णय आलेला आहे असे, उघड केले पाहिजे.

वयोमर्यादा :-

जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य /केंद्र सरकारी कर्मचार्याच्या बाबतीत कमाल व्योम्यादा लागू असणार नाही.

कामाचे स्वरूप :-

निवड झालेल्या उमेदवारांची, जेथे नियुक्ती केली जाईल, तेथील न्यायालय, इमारतीची, इमारतीच्या परिसराची, निवस्थानाची व कार्यल्यांच्या प्रासधनगृहांची नियमीत स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे.

न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे.

वरील अ आणि ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे.

वेतनश्रेणी :-

सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस -१ रु. १५००० -४७६०० /- अधिक नियमानुसार देय भत्ते.

उमेदवारांना सूचना :-

अर्ज करण्याची पध्दत :- जाहिरात, अर्ज व प्रमाण पत्र जिहा न्यायालय, लातूरचे संकेतस्थळ https://laturr.dcourts.gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या स्व :प्रमाणित प्रती अर्जा सोबत सादर करावीत. कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणा द्वारे म्हणजेच By Hand अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच बंद पाकिटावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शासकीय कर्मचार्याने अर्ज कसा करावा :-

जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या -त्या विभाग /कार्यलयात प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज सादर करावा.

उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वत : किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यास भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, त्यास अपात्र ठरविण्यात येईल. याबाबतीत निवड समितीच्या निर्णय अंतीम राहील.

उमेदवाराने त्याचे /तिचे अलीकडचे पास्स्पोर्त आकारचे रंगीत छायाचित्र (फोटो ) अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वत:ची स्वाक्षरी करावी.

दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखे नंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत.

अर्जा सोबत नमुना -अ मधील प्रतिज्ञा पत्र जोडावे. तसेच नमुना घोषणाही जोडावी.

विहित नमुन्यात नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविनेत येईल.

अल्पसूची :-

सफाईगारच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता /योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा  न्यायालय, लातूर येथी सूचना फलक व https://latur.dcourts.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल.

अशी अल्पसुची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीने स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत.

चापल्य व साफसफाई परीक्षा :-

सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफ सफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.

चापल्य व साफ सफाई परीक्षे मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येचा ३ पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. १:३ हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात  येईल.

उमेदवारांना कागद पत्रे पलताळणी करिता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्व;खर्चाने हजर राहावे लागेल.

सेवा प्रवेश प्रक्रीये बाबतची सर्व माहिती /सूचना /बदल जिल्हा न्यायालय, लातूर सूचना फलकावर व https//latur.dcourts.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु कोणासही व्यक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

वयाच्या पलताळणीसाठी जन्म प्रमाण पत्र अथवा शाळा सोडल्याच्या दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला आवश्यक राहील.

सेवाप्रवेश प्रक्रियेचे वेळा पत्रक वेळो वेळी या कार्यालयाचा संकेतस्थळावर https://latur.dcourts.gov.in व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.

लघूसूचित होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांची नवे जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर तसेच सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येतील. पुढील चाचणी करिता बोलवण्या बाबतची सूचना हि साध्या टपाल द्वारे दिली जाणार असल्या मुळे उमेदवारांनी वेळो वेळी संकेतस्थळास भेट देणे त्यांच्या हिताचे राहील. लघुसूची प्रसिद्ध वेळो वेळीच ओळख पत्राचा नमुना संकेतस्थळावर अपलोड केला जाईल याची नोंद घ्यावी.

त्या नंतर ओळख पत्राचा नमुना उमेदवारांनी संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊन व्यवस्थित रित्या भरून आणि त्यावर आपले नवीनतम पास्स्पोर्त आकारचे छायाचित्र (अर्जासोबत पूर्वी सादर केलेले ) चिकटवून आणि त्यावर दिलेल्या जागी काळ्या शाईने स्वाक्षरी करून जिल्हा न्यायालयास दिलेल्या तारखांना सादर करावे आणि आपले प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे. प्रवेश पत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.

घोषणा :-

मी वर नमूद उमेदवार याद्वारे शपथपूर्वक घोषित करतो/करते मला शासकीय सेवे करिता करिता घोषित केलेले नाही. तसेच मला फोजदारी गुन्ह्यात अटक व शिक्षा झालेली नाही आणि माइयाविरुद्ध कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही/फोजदारी न्यायालया मध्ये खटला प्रलंबित प्रस्तावित नाही.

मि या द्वारे शपथपूर्वक असेही घोषित करतो /करते हे अर्जा मध्ये नमूद केलेली माहिती माइया माहितीनुसार सत्य आणि बरोबर आहे. त्यातील कोणतीही गोष्ट खोटी /चुकीची आदळल्यासमला निवड प्रक्रीये पासून अपात्र घोषित केले जाईल आणि जर निवड /नेमणूक झाल्यास, माझी सेवा कोणतीही सूचना दिल्याविना समाप्त केली जाईल याची मला जाणीव आहे.

तसेच दिनांक २८ मार्च, २००५ नंतर जन्मलेला मुलांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास मला सदर पदा वरून अपात्र ठरविण्यात येईल.

उमेदवारी अर्ज सादर केला म्हणून मला चाचणी /मुलाखतीस बोलाविले जाण्याचा अधिकार प्राप्त नाही याची मला जाणीव आहे.

 

उमेदवाराची स्वाक्षरी 

                                                                                                                                                                                                     उमेदवाराचे नाव 

 

प्रतिज्ञापत्र :-

मी “सफाईगार ” या पदासाठी माझा अर्ज सादर केला आहे.

आज रोजी मला ……(संख्या ) इतकी ह्यात मुळे आहेत, त्यापैकी दिनांक २८/३/२००५ नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या …….आहे (असल्यास जन्म दिनांक नमूद करावा)

ह्यात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८/३/२००५ नंतर जन्माला आलेल्या मुला मुळे या पदासाठी मी अपात्र ठरविण्यात पात्र होईल, याची मला जाणीव आहे.

मी असेही जाहीर करतो /करते कि, माझे विरुद्ध कोणताही फोजदारी गुन्हा दाखल नाही किंवा माझे विरुद्ध फोजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नाही किंवा माझे विरुद्ध शिस्तभंगाची कार्येवाही झालेली नाही.

या जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व सूचना व अटी मला मान्य आहेत.

 

स्थळ :-

दिनांक :-

अर्दाराचे नाव व सही 

 

 

Leave a Comment