२०२४ वर्षासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील पदांच्या भरतीची मोठी जाहिरात

NHM Nashik Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील वैदकीय अधिकारी पदांसाठी रिक्त जागा (महाराष्ट्र -१ जागा )भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (राष्टीय आरोग्य अभियान ) भरती मंडळाने जाहिरातीत जाहीर केली आहेत. पात्र उमेदवारांना https://zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट द्वारे त्यांचे अर्ज ऑफलाईन सबमिट करण्याचे  निर्देश दिले आहेत.  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशिलावर (जाहिरात pdf )काळजीपूर्वक वाचा. अर्ज सबमिट करण्याची शेवटी तारीख १९ मार्च २०२४ आहे.

शेक्षणिक पात्रता :-

एमबीबीएस 

नौकरी ठिकाण :-

नाशिक 

वेतन :-

६०,००० /-

अर्ज पत्ता :-

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि नाशिक 

अटी व शर्ती :-

वरील सर्व पदे कंत्राटी स्वुपाची व एकत्रित मानधनाची असून त्याच कालावधी हा दि. ३१ / ३ / २०२४ पर्यतेचा राहू शकेल. अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील. अथवा सन २०२४ -२५ करीत मंजुरी न झाल्यास वरील पदांची सेवा दि.३१ /३ /२०२४ रोजी आपो आप संपुष्टात येईल. परंतु वरील पदे सन २०२४ -२५ मध्ये मंजूर झाल्यास पुढील ११ महिने २१ दिवस कालावधी करिता नियुक्ती मुल्यांकन देण्यात येईल.

उमेदवारा कडून जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ते दि. २२/३ /२०२४ या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११.०० वा ते सायं ५.०० वा . या वेळेत अर्ज स्वीकृत करण्यात येईल. अर्ज स्वीकृती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय , पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने  स्वीकारण्यात येईल.

वरील नमूद पदे हि राज्य शासनाची पदे नसून  निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवे प्रमाणे असलेल्या नियम व अटी शर्ती या बाबतचा हक्क वा दावा राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाने सेवा नियम लागू नाही.

केंद्र /राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्व सूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल .

सर्व पदांसाठी उमेदवारांनी शेक्षणिक अर्हतेची १० वी (गुण पत्रक /प्रमाण पत्रक) १२ वी (गुण पत्रक /प्रमाण पत्र ), पदवीचे सर्व गुण पत्रक (प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष ) पदवी प्रमाण पत्र, पदवी नोंदणी प्रमाण पत्र, जात प्रमाण पत्र, वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला ) व अनुभवी प्रमाण पत्र हे जोडण्यात यावे. तसेच जोडण्यात आलेली सर्व कागद पत्र स्व साक्षांकित केलेली असावी.

वयोमर्यादा :-

वैदकीय अधिकारी (एमबीबीएस ) पूर्ण वेळ पदांसाठी सेवा कोणतीही पूर्व सूचना न देता तत्काळ खालील प्रमाणे राहील.

एमबीबीएस यांची वयोमर्यादा ७० वर्ष राहील.

वय वर्ष ६० नंतर प्रत्यक वर्षी  जिल्हा शल्य चिकित्सक यांची कडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाण पत्र  सादर करणे बंधन कारक राहील.

शासकीय कर्मचारी यांच्यावर पूर्वीचा शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही स्वरूपाचे प्रशसकीय व वित्तीय कार्यवाही किंवा फोजदारी अथवा इतर कुठल्याही गंभीर गृन्ह्याची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.

अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फोजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

उमेदवाराने अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सादर पदा करिता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग ) अर्जा मध्ये स्पष्ट पणे नमूद करावा :-

उपरोक्त पदान करिता असलेला सर्व सूचना (तात्पुरते पात्र, अपात्र, हरकती स्वीकारणे, अंतिम पात्र /अपात्र, मुलाखतीस किंवा लेखी पर्रीक्षेत  निवड झालेल्यांची यादी, मुलाखत अथवा लेखी परीक्षा वेळा पत्रक ई .) ह्या बाबी WWW.ZPNASHIK.MAHARASHTRA.GOV.IN या संकेत स्थळावर वेळो वेळी प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सिन्नर कार्यालयातील नोटीस बोर्डवर वेळो वेळी लावण्यात येतील. तथापि उमेदवारास कोणतेही वेगळी सूचना अथवा दूरध्वनी, एस .एम .एस , ई .मेल केला जाणार नाही याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्या करिता उमेदवारांनी वेळो वेळी संकेत स्थळास /कार्यलयास भेट देणे अनिवार्य्य राहील. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सिन्नर या कार्यालया कडील ०२५५१-२९९५५२  या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता.

अर्जाचा नमुना हा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर नमुन्या प्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. उमेदवाराचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. या बाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही. मुलाखती नंतर निवड झालेल्या उमेदवारांना करार पत्रातील अटी मान्य असल्या बाबत रु. १०० चे बॉंड पेपरवर करारनामा पदावर रुजु होतांना सादर करावा लागेल.

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्या पासून ७ दिवसा मध्ये नियुक्तीचा ठिकाणी रुजु होणे बंधन कारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती व आदेश आपो आप संपूष्टात आणून प्रतीक्षाधीन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.

शासकीय, निम शासकीय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अनुभव असणाऱ्या व उच्च शेक्षणिक अर्हता धारकाचा प्राधान्याने विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल.

उपरोक्त तक्त्यात उल्लेखित पदान करिता उमेदवारांनी रु. १५०/- चा कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकेचा डिमांड ड्राफ जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ मांगे स्वत चे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे. सदर डिमांड ड्राफ्ट SINNAR THO NUHM  या शाखेवर देय असलेला असावा.

निवड प्रक्रीये हि प्राप्त अर्जाचा संख्ये नुसार अर्जाची छाननी करून गुणानु क्रमे यादे तयार करणात येईल. रिक्त पदांच्या संख्ये नुसार १:५ या प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्यात येईल. राष्ट्रीय सह्री आरोग्य अभियान अंतर्गत भरण्यात येणारी सर्व पदांची निवड हि निवड यादीतील गुणानु क्रमांकाचा प्राधान्या नुसार व मुलाखतीचे गुणानुसार होईल. अर्ज सादर करणे कामी व मुलाखती करिता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.

सदरहू भरती प्रक्रीये करिता अर्जाची छाननी, निवड यादी प्रसिद्ध करणे हरकती/आक्षेप प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे तसेच  भरती प्रक्रिया पार पडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे ई . बाबत सविस्तर तपशील वेळो वेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती सिन्नर या कार्यलयाचा  नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या बाबत पुनश्च वर्तमान पत्रा मध्ये जाहिरात दिली जाणार नाही.

सदर रिक्त पदांच्या संख्येत सामाजिक आरक्षण तसेच पद स्थापनेचा ठिकाण मध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यलयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक यांनी राखून ठेवलेले आहेत.

 

 

 

 

 

Leave a Comment